Ad will apear here
Next
जयगडला नवरात्रौत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील नवतरुण मंडळातर्फे १० ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी सात वाजता पूजा, सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री नऊ वाजता भजन आणि १० वाजता दांडिया असे कार्यक्रम होणार आहेत.

‘जयगड परिसरातील नागरिकांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मंगेश साळवी, उपाध्यक्ष विश्वास धुंदूर, सचिव ऋषीराज धुंदूर आणि खजिनदार राजेश केदारी यांनी केले आहे.

उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सभासद अनिरुद्ध साळवी, अनिल कांबळे, लक्ष्मीकांत सोनार, देविदास हळदणकर, नारायण काताळकर, संतोष पाडाळकर, सचिन भोपळे, नागेश झगडे, शर्मिला साळवी मेहनत घेत आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZRUBT
Similar Posts
‘जेएसडब्ल्यू’तर्फे जयगड येथे शिक्षकांसाठी शिबिर जयगड : येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडच्या सीएसआर विभागातर्फे मानस समुपदेशन, रत्नागिरीतील मानसोपचार व मूल्यमापन केंद्र आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षकांसाठी ‘वर्गाचे मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षकांची भूमिका’ हे दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.
जयगड-बागवाडी अंगणवाडीत पूरक पोषण आहाराचे वाटप जयगड : अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील बालकांसाठी नावीन्यपूर्ण पूरक पोषण आहार या योजनेचा शुभारंभ रत्नागिरी तालुक्यातील जयगड-बागवाडी अंगणवाडी केंद्रात करण्यात आला. जयगडच्या ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे जीवन कौशल्य कार्यशाळा रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे वरवडे येथील माध्यमिक विद्यालय, पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, मालगुंड येथील शिरीष मुरारी मयेकर विद्यालय, बळीराम परकर विद्यालय, चाफे येथील सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ विद्यालय येथे जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सोनाली कदम आणि माणिक बाबर यांनी मार्गदर्शन केले
‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडतर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एक डिसेंबर २०१८ रोजी ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग (डीएपीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रक चालक व क्लीनर यांना मार्गदर्शन करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language